Greenlam Industries: लॅमिनेट उत्पादनातील सर्वोत्तम कंपनी

आशिया खंडात सर्वाधिक जास्त लॅमिनेटचे उत्पादन करणारी कंपनी म्हणजे ग्रीनलॅम इंडस्ट्री. Decowood, Mikasa, NewMika, Greenlam Clads, Greenlam Sturdo अशा विविध ब्रँडची मूळ कंपनी म्हणजे ग्रीनलॅम इंडस्ट्री आहे. त्यामुळे ही कंपनी इंटेरियरसाठी अत्यंत महत्त्वाची कंपनी समजली जाते.

या कंपनीचे देशात जवळपास १४००० पेक्षा जास्त वितरक आहेत. जागतिक बाजारात ही कंपनी १०० हून अधिक देशात पोचली आहे. तसेच १४ देशांमध्ये वितरक आणि मार्केटिंगचे सेटअप आहेत.

जागतिक बाजारातील इंटेरियरचे ट्रेंड भारतात घेऊन येणारी आणि जागतिक बाजारात स्वतःचे ट्रेंड तयार करणारी ही कंपनी आहे.

निवासी आणि व्यावसायिक जागा सुशोभित करण्यासाठी डिझाइन केलेले उच्च-गुणवत्तेचे लॅमिनेट तयार करणारी पॉवरहाऊस, ग्रीनलॅम इंडस्ट्रीजकडे उत्पादनांचा एक संपूर्ण पोर्टफोलिओ आहे. ज्यामध्ये सतत नवीन शैली आणि नमुन्यांची वैशिष्ट्ये आहेत. उच्च गुणवत्तेच्या बेंचमार्कचे पालन करून उत्पादित केलेली, यांची उत्पादने विविध आवश्यकता पूर्ण केली आहेत.

गेल्या ५ वर्षात या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास १७७.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर महिन्याभरात ७ टक्क्यांनी हे शेअर्स वधारले आहेत. मात्र आज या कंपनीच्या शेअर्स मध्ये थोड्याफार प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळाली.

Scroll to Top