नटिंघम – न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका सुरू असून आजपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कर्णधाराच्या जागी हामिश रदरफोर्डचा न्यूझीलंडच्या संघात समावेश केला आहे. तर केनच्या गैरहजेरीत टॉम लॅथम याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले आहे.
पहिल्या कसोटीत इंग्लंडने शानदार विजय मिळवला होता. या सामन्यात केनला फार खास कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात १५ धावांवर तो बाद झाला होता. तर आता केनला कोरोनाची लागण झाल्याने नियमानुसार पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे.
पहिल्या कसोटीत इंग्लंडने ५ विकेटनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता तीन सामन्यांच्या कसोटीत न्यूझीलंड १-०ने मागे आहे. दरम्यान, आजच्या इतक्या महत्त्वाच्या सामन्यातून केनचे संघाबाहेर होणे निराशजनक आहे, असे न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टीड म्हणाले.