संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

दहावी – बारावीच्या परिक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – परिक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीवरून विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइनच होणार असून याबाबत आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन 10 वी आणि 12 वी परिक्षेबाबत सविस्तर माहिती दिली.

शरद गोसावी म्हणाले की, परिक्षा पुढे ढकला किंवा परिक्षा ऑनलाईन द्या, अशा मागण्यांचे कोणत्याही विद्यार्थ्यांकडून शिक्षण मंडळाला निवेदन आलेले नाही. तसेच ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी झाला असल्याने 70 ते 80 गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून 40 ते 60 गुणांच्या पेपरला 15 मिनिटे अधिक वेळ दिला जाईल. तसेच एका वर्गात 25 विद्यार्थी असतील, त्यांना कोरोनामुळे जीकजॉक पद्धतीने बसवण्यात येणार आहे. दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022 दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा 4 ते 30 मार्च दरम्यान होणार असून 14 ते 3 मार्चदरम्यान श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होईल, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान 1 ते दीड तास आधी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल. कोरोनामुळे अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली असल्याने लेखी परीक्षेचे आयोजन 75 टक्के अभ्याक्रमावर करण्यात आले असल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami