संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

झुकेरबर्गच्या संपत्तीत ३१ अब्ज डॉलरची घट; गुंतवणूकदारांचे २०० अब्ज डॉलर्स बुडाले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – फेसबुकसाठी ३ फेब्रुवारी हा दिवस अतिशय वाईट ठरला. गुरुवारी फेसबुकच्या स्टॉकमध्ये २६.४४ टक्क्यांची मोठी घसरण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. या घसरणीमुळे फेसबुकची मूळ कंपनी मेटाचे मार्केट कॅप $ २०० बिलियनने प्रचंड घटले. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कोणत्याही अमेरिकन कंपनीसाठी ही सर्वात मोठी एक दिवसीय घसरण असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, या घसरणीमुळे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या मालमत्तेलाही मोठा फटका बसला असून, ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गेल्या २४ तासांत झुकेरबर्गच्या संपत्तीत ३१ अब्ज डॉलरची घट झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती ८९.६ अब्ज डॉलरवर आली आहे. तसेच शेअर्सच्या प्रचंड घसरणीमुळे मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीत एका दिवसातील सर्वात मोठी घसरण झाली आणि अवघ्या दोन तासात त्यांची संपत्ती $३१ अब्जने कमी झाली. फेसबुकच्या मूळ कंपनीत, मेटाच्या शेअर्समध्ये झालेल्या या प्रचंड घसरणीमुळे कंपनीचे मार्केट कॅप $ २०० बिलियनपेक्षा जास्त कमी झाले.

या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, कोणत्याही अमेरिकन कंपनीसाठी ही एक दिवसाची सर्वात मोठी घसरण आहे. या घसरणीनंतर झुकेरबर्गची एकूण संपत्ती आता $८५ बिलियनवर आली आहे. डिसेंबर २०२१ च्या तिमाहीत मेटाचा नफा आठ टक्क्यांनी घसरून $१०.२८अब्ज झाला, जो मागील वर्षीच्या कालावधीत $११.२१ अब्ज होता. फेसबुकचे सीएफओ डेव्हिड वेहनर म्हणाले की, या वर्षी जाहिरात महसुलात $१० अब्जची घट होऊ शकते.

नोव्हेंबर २०२१ मध्ये, टेस्ला इंकच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाल्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांना एका दिवसात ३५ अब्ज डॉलर्सचे मोठे नुकसान झाले होते. या मोठ्या घसरणीमुळे शुक्रवारी संपत्तीच्या बाबतीत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी एकूण संपत्तीसह मार्क झुकरबर्गला मागे टाकले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami