संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 29 March 2023

फ्रीलान्सिगद्वारे मिळालेल्या उत्पन्नावर किती टॅक्स लागतो?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गेल्या काही दिवसांत फ्रीलान्सर्सची मागणी वाढत आहे. आपला नोकरी व्यवसाय सांभाळून अनेकजण जास्तीच्या कमाईसाठी फ्रीलान्स कामेही घेतात. मात्र, यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही टॅक्स लावला जातो. यामध्ये इन्कम टॅक्स आणि GST दोन्ही लागू आहेत. 2020-21 साठी ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. टॅक्सच्या भाषेत, फ्रीलान्स नोकऱ्यांमधून मिळणारे उत्पन्न हे ‘व्यवसायातील नफा’ म्हणून मानले जाते. कारण असे उत्पन्न हे स्वयंरोजगारातून मिळणारे उत्पन्न म्हणून पाहिले जाते. इतर पगारदार व्यक्तीप्रमाणे फ्रीलान्स व्यक्तींनाही टॅक्स द्यावा लागतो. मात्र, या टॅक्सचे गणित जरा वेगळे आहे.

फ्रीलांसर फक्त इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी ITR-3 किंवा ITR-4 ची निवड करू शकतो. जर एखाद्या पगारदार व्यक्तीने एखाद्या विशिष्ट आर्थिक वर्षात त्याच्या नोकरीच्या बाहेर फ्रीलान्सिंगमधून कोणतेही उत्पन्न मिळवले असेल तर त्याला व्यवसाय किंवा व्यवसायातून उत्पन्न असलेल्यांसाठी पात्र असलेल्या ITR फॉर्मची निवड करावी लागेल. व्यवसायाच्या उत्पन्नाप्रमाणे, फ्रीलान्सिंगमधून उत्पन्न असलेल्या करदात्यांना त्यांच्या उत्पन्नातून असे खर्च वजा करण्याचा पर्याय असतो, जे फ्रीलान्स काम करण्यासाठी केले जातात.

किती भरावा लागेल टॅक्स

आर्थिक वर्षातील उत्पन्न विविध स्त्रोतांतून निश्चित केले पाहिजे. तसेच, देय करावर येण्यासाठी खर्च आणि पात्र टॅक्स सूट वजा करावी. बहुतेक कंपन्या फ्रीलांसरना केलेल्या पेमेंटवर TDS कापतात, म्हणून कर दायित्वाची गणना करताना TDS समाविष्ट करा. निव्वळ करपात्र रक्कम रु. 10,000 पेक्षा जास्त असेल तेव्हा फ्रीलान्स उत्पन्न असलेल्या लोकांना प्रत्येक तिमाहीत देय तारखेच्या आत ऍडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. 10,000 रुपयांपेक्षा जास्त असलेला एकूण टॅक्स तुम्ही मोजला तर तुम्हाला आयकर कायद्यानुसार त्यावर व्याज द्यावे लागेल.

जर फ्रीलान्स कामासाठी एखादी जागा भाड्याने घेतली असेल तर अशा मालमत्तेवर टॅक्स कपातीचा दावा करू शकता. म्हणजेच, अशा मालमत्तेवर तुम्ही केलेल्या कोणत्याही दुरुस्तीची किंमत, तुमच्याकडे कामासाठी असलेले लॅपटॉप किंवा पर्सनल कॉम्प्युटर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुरुस्ती, इंटरनेट बिल आणि फोन बिल इ. सामील करू शकता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या