बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिस्ट अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई बनणार आहे. सोशल मीडियावरून तिने ही आनंदाची बातमी दिली आहे. तिने बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून नेटीझन्सने तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.
सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर पती आनंद आहुजासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सोनम कपूरने बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती पती आनंद आहुजासोबत दिसत आहे. सोनम कपूरने तीन फोटो शेअर केले असून, दोन ब्लॅक अॅण्ड व्हाईट तर एक कलर फोटो आहे.
सोनम कपूरने गुड न्यूज दिल्यानंतर सगळे सोनम आणि आनंद आहुजाचं अभिनंदन करत आहेत. वाणी कपूर, करीना कपूर, अंशुला कपूर, खुशी कपूर, जान्हवी कपूर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोनमचं अभिनंदन केलं आहे.