संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

एसबीआयचे ‘मल्टी ऑप्शन डिपॉझिट’

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आज बाजारात प्रत्येकाच्या गरजेनुसार अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. असा एक पर्याय म्हणजे मल्टी ऑप्शन डिपॉझिट. स्टेट बँक ऑफ इंडिया मल्टी ऑप्शन डिपॉझिटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या हवे तेव्हा पैसे काढता येतात.

तुमच्या बचत खात्यात पैसे कमी असतील तर तुम्ही MOD खात्यातून बचत खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता आणि ATMच्या मदतीने पैसे काढू शकता. एसबीआयचे म्हणणे आहे की, ज्या प्रकारे बँकेत मुदत ठेव खाते उघडले जाते, त्याच प्रकारे मल्टी ऑप्शन डिपॉझिट खाते उघडले जाऊ शकते. एसबीआय मल्टी ऑप्शन डिपॉझिट खात्यात 10,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. त्यापेक्षा जास्त रक्कम 1000च्या पटीत जमा करता येते. कोणतीही कमाल ठेव मर्यादा नाही. येथे तुम्ही 1 वर्षापासून ते 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. मल्टी ऑप्शन डिपॉझिट खात्यावर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम 10,000 पेक्षा जास्त असल्यास त्यावर TDS कापला जातो. पॅनकार्डचे तपशील सादर केल्यास ते 10 टक्के असेल आणि जमा न केल्यास 20 टक्के TDS असेल.

या गुंतवणुकीवर कर्ज आणि नॉमिनेशन घेण्याची सुविधाही आहे. ते बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर केले जाऊ शकते. मात्र मल्टी ऑप्शन डिपॉझिटशी जोडलेल्या बचत खात्यात किमान शिल्लक राखणे अनिवार्य आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami