संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 07 December 2022

पेटीएमचे शेअर आज १२ टक्क्यांनी घसरले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आज आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात अत्यंत सकारात्मक वातावरण आहे. सेन्सेक्स, निफ्टीने सकाळच्याच सत्रात उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र पेटीएमच्या शेअर्ससाठी आजचा दिवस जरा नकारात्मक दिसत आहे. कारण या शेअर्सची सुरुवात आज खूपच खराब झाली.

शुक्रवारी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली होती. त्याचा परिणाम आज पेटीएमच्या शेअर्सवर दिसून येत आहे. हे शेअर्स सुरुवातीच्या व्यापारात १२ टक्क्यांनी घसरून ६७२ रुपयांवर आले.

दरम्यान, पेटीएम हा देशातील सर्वात मोठ्या आयपीओंपैकी एक असून त्याचा सुरुवातीला खूप गाजावाजा झाला होता पण त्यात गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. जेव्हा पेटीएमचे शेअर्स लिस्ट केले गेले तेव्हा त्याचे मार्केट कॅप १.३९ लाख कोटी रुपये होते पण शेअर घसरल्याने मार्केट कॅप अवघ्या ४ महिन्यांत ५० हजार कोटींवर आले आहे. शु्क्रवारी, ११ मार्च रोजी मार्केट कॅप ५०.३६ हजार कोटींवर आले.

महत्त्वाचे म्हणजे आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला आयटी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. आयटी ऑडिटचा अहवाल पाहिल्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेकडून दिली जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami