संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

अभिजित आणि कयादूची लव्हेबल केमिस्ट्री; ‘आय प्रेम यु’चे मोशन पोस्टर प्रदर्शित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं! या वाक्याने तर आजवर अनेक प्रेमांना एकत्रित बांधले आहे. पावसाच्या चाहूलीला मोराचा थुईथूईयाट जसा पाहायला मिळतो तसा व्हॅलेंटाईन डे आला की आपल्यात दडलेला प्रेमी आणि दडलेल्या प्रेमभावना फेर धरून नाचू लागतात. असा हा प्रेममय दिन येताच मनात फुलपाखरं बागडू लागतात आणि या रोमँटिक दिवसाची खास सुरुवात करावीशी वाटते. मात्र यंदाचा हा रोमँटिक क्षण तुमच्या भेटीस साईश्री एंटरटेनमेंट’ यांच्या आय प्रेम यु’ या चित्रपटासोबत घालवता येणार आहे. चित्रपटाचे नाव ऐकताच चित्रपटाच्या कथेचे स्वरूप कळलेच असेल, मात्र नेमकं वेगळेपण असे या चित्रपटात काय आहे हे अनुभवण्यासाठी हा चित्रपट प्रियकरासोबत पाहणे रंजक ठरणार आहे.

मात्र हा चित्रपट पाहण्यास थोडीशी वाट पाहावी लागणार आहे कारण येत्या ‘व्हॅलेंटाईन डे’ चे औचित्य साधत चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस येत असून प्रेक्षकांची रंगत वाढवणार आहे. या चित्रपटाचे विशेष म्हणजे यात अभिनेता अभिजीत आमकर मुख्य भूमिकेत दिसणार असून त्यासोबत अभिनेत्री कयादू लोहार मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिजीत आणि कयादूची लव्हेबल केमिस्ट्री या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आय प्रेम यु’ चित्रपटाची प्रेमकहाणी ही फक्त प्रेमकहाणी नसून प्रेमाची कहाणी आहे. मैत्री आणि अलगद तयार झालेल्या नात्यांची ही गुंतागुंत या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. अभिजीत मुख्य भूमिकेत असून याआधी अभिजीतचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. ‘टकाटक’, ‘एक सांगायचय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेता अभिजीत आमकरने कायमच प्रेक्षकांच्या मनात घर केले. वेगवेगळ्या फोटोशूटमुळे आणि म्युझिक अल्बममधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येत राहिला. आता लवकरच अभिजीत एका नव्या कोऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. रोमँटिक कलाकारांच्या यादीत अभिजीत कुठेही कमी नाही, त्यामुळे अभिजीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात उतरविण्यास नक्कीच तयार असेल यांत शंकाच नाही. अभिजीत आणि कयादूची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार असून त्यांच्या अभिनयाच्या आणि कथेच्या जोरावर हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या प्रेमात रंगत आणेल यांत शंकाच नाही.

या चित्रपटात अभिजीत सखा या पात्राची भूमिका साकारत असून संगीताची आवड असलेला सखा स्वतःच्या प्रेमात कसे संगीताचे सूर भरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. तर कयादू या चित्रपटात वीणा हे पात्र साकारत असून स्वप्न उराशी बाळगून आलेल्या संकटाना सामोरी जाण्याची जिद्द असणारी अशी ही वीणा आपल्या प्रेमाला कशी सामोरी जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दिग्दर्शक नितीन कहार दिग्दर्शित हा चित्रपट निर्माते मधुकर गुरसळ यांच्या ‘साईश्री एंटरटेनमेंट’ यांनी निर्मित केला आहे. या प्रेमाच्या लव्हेबल केमिस्ट्रीचे छायाचित्रण अविनाश सातोस्कर यांनी चित्रित केले आहे.

येत्या ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत प्रदर्शित होणाऱ्या ‘आय प्रेम यु’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरने प्रेमीयुगुलांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास केव्हा येतो हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami