ICICI PayLater वापरणाऱ्या ग्राहकांना आता सेवा शुल्क भरावा लागणार आहे. आतापर्यंत ही सेवा वापरण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नव्हते. मात्र आता आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत जाणून घेऊया.
ICICI PayLater वापरणाऱ्या ग्राहकांना 1000 रुपयांपेक्षा जास्त मासिक खर्चावर सेवा शुल्क भरावे लागेल. 1001 ते 3000 रुपयांपर्यंत खर्च करण्यासाठी 100 रुपये सेवा शुल्क कराव्यतिरिक्त भरावे लागतील. 3001 ते 6000 रुपयांपर्यंतच्या खर्चासाठी कराव्यतिरिक्त 200 रुपये सेवा शुल्क भरावे लागतील. तसेच 6001 रुपये ते 9000 रुपये खर्च केल्यास 300 रुपये सेवा शुल्क कराव्यतिरिक्त भरावे लागेल. अशाप्रकारे 1000 रुपयांपर्यंत खर्च करण्यासाठी कोणतेही सेवा शुल्क द्यावे लागणार नाही.
ICICI Pay Later Account हे एक प्रकारचे डिजिटल क्रेडिट आहे. या सेवेअंतर्गत तुम्ही आधी खर्च करू शकता आणि नंतर पैसे देऊ शकता. या अंतर्गत, बँक आपल्या ग्राहकांना 30-45 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजमुक्त क्रेडिट सेवा देते. ही सेवा आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या बँकेचे ग्राहक आयसीआयसीआयच्या iMobile ऍप, पॉकेट्स ऍप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ऍक्टिव्ह करू शकतात.