सोनी मराठी वाहिनीवरील इंडियन आयडल मराठी हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळते आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून श्रीवल्ली हे गाणं गायलेला सिड श्रीराम येणार आहे.
श्रीवल्ली हे पुष्पा या चित्रपटातलं गाणं सध्या तुफान गाजतंय. या गाण्याचा गायक सिड श्रीरामने तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा भाषेत गाणी गायली आहेत. पहिल्यांदाच एका मराठी कार्यक्रमात श्रीराम गाणं गाणार असून काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या युट्युब चॅनलवर अप्सरा आली या गाण्याचं कव्हर केलं होतं ज्याला प्रेक्षकांची विशेष पसंती देखील मिळाली होती. हा कार्यक्रम २८ फेब्रुवारी रात्री ९ वाजता प्रदर्शित होणार आहे.