संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

#INDvsSA : आजपासून रंगणार ट्वेंटी-20चा थरार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत युवा फलंदाज रिषभ पंत भारताचे नेतृत्त्व सांभाळणार आहे. तर हार्दिक पांड्याला उप कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. लोकेश राहुल आणि कुलदीप यादव यांनी दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे. अशा स्थितीत पहिल्यांदाच संघाचे नेृत्वव सांभाळणाऱ्या रिषभ पंतवर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमाकडे असणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण १५ वेळा समोरासमोर आला आहे. यामध्ये भारताने नऊ, तर दक्षिण आफ्रिकेने सहा सामने जिंकले आहेत. यावरून भारतीय संघाचेच पारडे जड दिसत आहे. आज पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami