रवि शंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट तासाभरासाठी बंद, ट्विटरकडून कारवाई

नवी दिल्ली – सोशल मीडिया कंपन्यांवर केंद्र सरकारने निर्बंध लादल्यानंतर ट्विटरने याविरोधात भूमिका घेतली होती. मात्र, आता ट्विटरने खुद्द माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांचंच ट्विटर अकाऊंट डिने करण्यात आलं आहे.  जवळजवळ तासभर आपल्याला लॉगइन करुन देण्यात आलं नसल्याचा दावा रवि शंकर प्रसाद यांनी केला आहे. यासाठी अमेरिकेतील कॉपीराईट कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं मला सांगण्यात आल्याचं रवि शंकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय.

रवि शंकर प्रसाद यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत. “मित्रांनो आज माझ्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली. ट्विटरने मला माझ्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेस जवळजवळ तासभर दिला नव्हता. मी अमेरिकेतील डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन केल्याचं मला सांगण्यात आलं आणि नंतर मात्र मला त्यांनी अ‍ॅक्सेस दिला,” असं पहिल्या ट्विटमध्ये रवि शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी, “ट्विटरची ही करावाई म्हणजे माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शकतत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिशास्त्र नियम) २०२१ मधील नियम ४(८) चे उल्लंघन आहे. त्यांनी (ट्विटरने) मला माझ्या अकाऊंटला अ‍ॅक्सेस नाकारण्याआधी सूचना दिली नव्हती,” असं म्हटलं आहे.

तिसऱ्या ट्विटमध्ये रवी शंकर प्रसाद यांनी, “ट्विटरचा (नवीन नियमांसंदर्भातील) उच्च उदासीनपणा आणि अनियंत्रित कृतीविरोधात आवाज उठवणारी माझी विधाने, विशेषत: टीव्ही वाहिन्यांना दिलेल्या माझ्या मुलाखतीच्या क्लिप्स मी शेअर केल्याने आणि त्याचे परिणामकारक प्रभाव दिसून आल्याने या गोष्टी घटल्याचं स्पष्टपणे दिसत आहे,” असं म्हटलं आहे.


या कृतावरुन ट्विटर भारत सरकारने लागू केलेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी का करत नाहीय हे स्पष्ट होतं आहे. कारण त्यांनी असं केलं तर त्यांच्या अजेंड्यामध्ये न बसणाऱ्या व्यक्तीचं खातं त्यांना अशापद्धतीने अचानक बंद करता येणार नाही, असा टोलाही रवी शंकर प्रसाद यांनी पुढील ट्विटमध्ये लगावला आहे. तसेच मागील अनेक वर्षांमध्ये मी शेअर केलेल्या माझ्या मुलाखतींच्या क्लिपसंदर्भात कोणत्याही वृत्तवाहिनीने किंवा एखाद्या अँकरने कॉपीराईट कायद्याअंतर्गत तक्रार केलेली नाहीय, असंही रवी शंकर प्रसाद म्हणालेत.

ट्विटरच्या या कारवाईवरुन ते दावा करतात त्याप्रमाणे त्यांचा भाषण स्वातंत्र्याला पाठिंबा असल्याचं दिसत नाही. उलट आपलाच अजेंडा रेटण्यामध्ये त्यांना रस आहे. ते सतत तुम्हाला आम्ही आखून दिलेल्या नियमांनुसार वागला नाहीत तर आम्ही तुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकू अशी भीती दाखवत असतात, असा आरोपही रवी शंकर प्रसाद यांनी केलाय.

Share with :
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on pinterest
Pinterest
Share on linkedin
LinkedIn

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami