अभिनेत्री कामना पाठकचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म ३ जून रोजी इंदोर येथे झाला. कामना पाठक ही मुळची इंदौरची असून तिचे शिक्षण दिल्लीत झाले आहे. कामनाने रंगभूमीवरुन आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे.
लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची इच्छा असणाऱ्या कामनाने प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत अनेक नाटकं केली आहेत. चाणक्य, आखरी शर्मा, मोतीराम का सत्याग्रह, काबूलीवाला या सारख्या अनेक सुपरहिट हिंदी नाटकांमध्ये तिने काम केले आहे. शिवाय ब्यूटी अँड द बिस्ट या इंग्रजी नाटकात देखील तिने काम केले होते. २०१६ मध्ये तिने मँगो ड्रिम्स या इंग्रजी चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने केलेला अभिनय पाहून तिला हिंदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. ‘हप्पू सिंह की उलटन पलटन’ या मालिकेतून तिने टीव्ही मालिकेच्या दुनियेत पदार्पण केलं आहे.’हप्पू की उलटन पलटन’ या विनोदी मालिकेत एक नाही दोन नाही तर ९ वस्ताद मुलांच्या आईची भूमिका कामनाने साकारली आहे. अभिनयासोबत कामना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
1 thought on “दिनविशेष! रंगभूमीपासून हॉलिवूड आणि बॉलीवूड गाजवणारी कामना पाठक”
buy sumatriptan sale – sumatriptan 50mg usa imitrex 25mg for sale