तिरुवानंतपूरम – केरळच्या ज्येष्ठ अभिनेत्री केपीएसी ललिता यांचे रात्री उशिरा राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपासून वाढत्या वयाच्या समस्यांनी त्या त्रस्त होत्या. त्यांच्या निधनाबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी दुःख व्यक्त केले आहे.
केरळच्या मनोरंजन क्षेत्रात ललितांचे मोठे योगदान होते. अनेक दशके त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले. केरळ संगीत नाटक अकादमीच्या त्या अध्यक्षा होत्या. वयाच्या १० व्या वर्षी त्यांनी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले. तेव्हापासून अनेक दशके चित्रपट आणि नाट्य सृष्टीची त्यांनी सेवा केली.