संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यासाठी आर्थिक अफरातफर करणारा व्यक्ती एकच, सोमय्यांचा आरोप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राष्ट्रवादीचे नेेत नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई झाल्यानंतर आज पुन्हा शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांना टार्गेट करण्यात आलं आहे. यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची धाड पडली. यानंतर भाजप नेते किरिट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत यशवंत जाधव, यामिनी जाधव, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. तसेच, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यासाठी आर्थिक अफरातफर करणारी व्यक्ती एकच असल्याचा खुलासाही त्यांनी केला.

किरीट सोमय्या म्हणाले की, मी काल डर्टी डझन नेत्यांची काल नावे जाहीर केली. मात्र, या यादीत काही लोकांनी नावे राहिली. आमदार यशवंत जाधव, त्यांच्या पत्नी यामिनी जाधव, महापौर किशोरी पेडणेकर यांनीही अनेक घोटाळे केले आहेत. यांचे घोटाळे याआधीही बाहेर आले होते. तसेच, किशोरी पेडणेकर यांच्या कंपनीने तर हे घोटाळे मान्यही केले आहेत. त्यामुळेच यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडले. यासाठी गेल्यावर्षीपासून पाठपुरावा सुरू असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले.

यशवंत जाधव यांच्या घोटाळ्याची माहिती देताना सोमय्या म्हणाले की, “यशवंत जाधव ज्या पद्धतीने मनी लॉन्ड्रींग करतात त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंचा परिवारही त्याच मार्गावार गेला आहे. उद्धव ठाकरेंनी मे २०२० मध्ये निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतरच ही गोष्ट सुरु झाली. विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करताना मालमत्ता दाखवताना उद्धव ठाकरेंनी १९ बंगले लपवले होते. यामिनी जाधव यांनीही अर्ज सादर करताना कोट्यावधी रुपयांची मालमत्ता लपवली. याची माहिती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी दिली. अर्ज सादर केल्यानंतर आपोआप तो आयकर विभागाकडे जातो. प्रधान डेवलपर्स नावाच्या शेल कंपनीद्वारे यशवंत जाधव यांनी १५ कोटी रुपये मिळवले. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींचे संबंध यशवंत जाधव यांनी घोषित केले. उदय शंकर महावार हा गांधी परिवाराचाही हवाला ऑपरेटर आहे. सोनिया गांधी परिवाराचे मनी लॉन्डिरग करणारा उदय महावार आहे. गांधी परिवारानेच उद्धव ठाकरेंसोबत त्यांची भेट घालून दिली असेल. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महापालिकेचे फंड गोळा करणारे यशवंत जाधव यांच्यासोबत भेट करुन दिली असेल या बद्दल माहिती नाही. सोनिया गांधीच्या नॅशनल हेरॉल्डमध्ये मनी लॉन्डिरग उदय शंकर महावारने केले आहे. ज्या कंपनीला शेल कंपनी घोषित करण्यात आले त्यांना पैसे देऊन यशवंत जाधव यांच्या परिवाराने पैसे देऊन चेक घेतले आणि त्यावर तीन कंपन्या तयार करण्यात आल्या,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

“उदय महावार यांनी सांगितले आहे की यशवंत जाधव यांचा माणूस पैसे द्यायचा. ते आम्ही बॅंकेत टाकत होतो आणि तो व्यक्ती चेक घेऊन जात होता. १५ कोटी रुपये यशवंत जाधव यांच्या खात्यामध्ये यायचे आणि त्याताली काही पैसा परदेशात पाठवण्यात आला. ही माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली. त्यानंतर सर्वांकडे गेले अनेक महिने आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत. त्यानंतर आज कारवाई सुरु केली आहे,” असे किरीट सोमय्या म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami