संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 02 December 2022

उद्या हरतालिका! जाणून घ्या, पूजेची योग्य वेळ, व्रत आणि विधी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – भाद्रपद तृतीयेला हरतालिकाचे पूजन करण्याची परंपरा आहे. कुमारिका आणि महिला हे व्रत करतात. भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा-अर्चा केली जाते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी महिला दिवसभर काहीच खात नाहीत. त्यामुळे हा उपवास सगळ्यात कडक मानला जातो.

उद्या गुरुवारी ९ सप्टेंबर २०२१ ला हरतालिका आहे. तिच्या पूजेचा योग्य मुहूर्त पहाटे ६ वाजून ३ मिनिटांपासून सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत आहे. प्रदोष काल हरतालिका व्रत पूजा मुहूर्त सायंकाळी ६ वाजून ३३ मिनिटांपासून रात्री ८.५१ वाजेपर्यंत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शिव-पार्वतीच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन करून महिला हे व्रत पूर्ण करतील.

भाद्रपद चतुर्थीला श्रीगणेशाची पार्थिव पूजा केली जाते. त्यापूर्वी तृतीयेला हरतालिकेचे पूजन केले जाते. यावर्षी उद्या ९ सप्टेंबरला हे व्रत आहे. देशाच्या अनेक राज्यांत हे व्रत साजरे केले जाते. या दिवशी महिला सकाळी लवकर उठून स्नान करतात. नवे वस्त्र परिधान करतात. पूजेसाठी चौपाटावर केळ्यांच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात. रात्रभर जागरण करून खेळ खेळतात, गाणी म्हणतात, भजन-कीर्तन करतात आणि आरती करतात. भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने हे व्रत केले होते, अशी आख्यायिका आहे.

काय आहे हरतालिकेची कथा?

हरतालिका एक पौराणिक कथा आहे. यानुसार पार्वतीच्या मैत्रिणी तिचे अपहरण करून तिला जंगलात घेऊन गेल्या होत्या. पार्वतीच्या इच्छेविरुद्ध भगवान विष्णूने तिच्याशी विवाह करू नये म्हणून तिच्या मैत्रिणी तिला जंगलात घेऊन जातात. तिथे देवी पार्वतीने भगवान शंकराची आराधना केली. तिच्या तपस्येने शंकर प्रसन्न होतात आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतात, अशी ही आख्यायिका आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami