संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 02 December 2022

वर्षभरात ७०० टक्क्यांहून अधिक परतावा देणारी GRM Overseas Ltd कंपनी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

तांदूळ उत्पादन, निर्यात आणि खरेदी-विक्रीमधील सर्वात महत्त्वाची कंपनी म्हणजे GRM Overseas Limited. ही कंपनी पॉलिथिनचेही उत्पादन करते. तांदूळ उत्पादन क्षेत्रातीह ही भारतातील अग्रगण्य कंपनी आहे.

GRM Overseas ची स्थापना 1974 मध्ये भागीदारी फर्म म्हणून करण्यात आली होती. ती पूर्वी गर्ग राइस अँड जनरल मिल्स म्हणून ओळखली जात होती आणि 3 जानेवारी 1995 रोजी तिचे सध्याच्या नावाने पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतर करण्यात आले. या कंपनीचे हरियाणातील पानिपत येथे प्रोसेसिंग युनिट आहे. ज्यामध्ये भात, लवंग, पिस्ता, तांदूळ आणि गहू प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. ही उत्पादने कामधेनू आणि शेफ या ब्रँड नावाने विकली जातात. बासमती तांदूळ सौदी अरेबिया युरोप आणि इतर देशांमध्ये निर्यात केला जातो.

जीआरएम ओव्हरसिज लिमिडेटच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात चांगलीच वाढ झाली आहे. वर्षभरात या कंपनीने गुंतवणूकदारांना जवळपास ७०० हून अधिक टक्क्यांनी परतावा दिला आहे. तर तीन वर्षांचा विचार केल्यास गुंतवणूकदारांनी ३ हजार ८३५ टक्के परतावा मिळवला आहे. सध्या (३ मार्च २०२२ रोजी) या कंपनीच्या शेअरची किंमत ५९१.९० रुपये आहे. मात्र, वर्षभरापूर्वी याची किंमत ६९ रुपये होती.

डिसेंबर 2021 संपलेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 288 कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 24.57 कोटी रुपये होता. तर मागील तिमाहीत महसूल 245 कोटी रुपये आणि नफा 23.55 कोटी रुपये होता. कंपनीचे डेट इक्विटी रेशो 1.03 पट आहे. त्याची निव्वळ विक्री 296 कोटी रुपये होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami