संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

एचआयव्हीचा शोध लावणारे ल्यूक माँटग्नियर यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पॅरिस – एचआयव्ही व्हायरसचा शोध लावणारे फ्रान्सचे संशोधक ल्यूक माँटग्नियर यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी पॅरिस उपनगरातील न्यूली-सुर-सीन येथे अखेरचा श्वास घेतला.

ल्यूक माँटग्नियर यांना एचआयव्ही व्हायरसचा शोध लावल्याप्रकरणी २००८ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. एचआयव्ही विषाणूवर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. विशेष म्हणजे कोरोनावर मात करण्यासाठी बनवल्या गेलेल्या प्रतिबंधात्मक लसींना त्यांनी जाहीरपणे विरोध केला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ल्यूक माँटग्नियर यांना श्रद्धांजली वाहिली असून एड्सविरूद्ध लढाईत त्यांचे योगदान अमुल्य होतं, असं म्हणत त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami