संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

माधवी पुरी बूच यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (सेबी) विद्यमान अध्यक्ष अजय त्यागी यांचा कार्यकाळ आज संपला. त्यांच्या जागी आता माधवी पुरी बुच यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने माहिती दिली. ही नियुक्ती सुरुवातीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी असल्याचे समजते आहे.

नोव्हेंबर 2021 पासून सेबीकडून नव्या नेतृत्वाचा शोध सुरु होता. यात देवाशिष पांडा, अनिल मुकीम आणि माधवी पुरी बूच ही तीन नावे आघाडीवर होती. त्यात माधवी पुरी बूच यांची सरशी झाली आहे. निवड समितीने माधवी पुरी बूच यांच्यावर विश्वास दाखवला असून त्यांची सेबीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती केली आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे प्रमुख पद सांभाळलेल्या माधवी पुरी बूच यांनी भांडवली बाजार नियंत्रक सेबीमध्ये 2017 ते 2021 या काळात संचालक म्हणून काम केले आहे. त्या सेबीच्या पहिला पूर्णवेळ महिला संचालक ठरल्या होत्या. आता सेबीच्या त्या पहिला महिला अध्यक्ष ठरणार आहेत. माधवी पुरी बूच यांचा वित्तीय सेवा क्षेत्रात जवळपास 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. आयआयएम अहमदाबादमधून त्यांनी मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami