ठाणे – भिवंडी शहरातील ठाणगे आळी येथील मीनाताई ठाकरे रंगायतनचे दुरुस्तीचे काम सुरु असताना रंगायतनच्या इमारतीबाहेर भंगार काढण्यात आला होता. या भंगाराला मंगळवारी अचानक आग लागली. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवण्यात आली. या आगीमुळे विद्युत उपकरणाच्या केबल जळाल्याने परिसरातील सुमारे पाच तास वीज बंद होती.
रंगायतनच्या मूळ प्रवेशद्वाराजवळ असलेल्या भंगाराला आग लागली. ही आग पसरल्याने त्याखाली असलेल्या गोळ्यांची पाकिटे आणि औषधाच्या बाटल्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या रंगायतन मधील पहिल्या मजल्यावर इदगारोड प्राथमिक आरोग्य केंद्र व बिजीपी दवाखाना सुरु होता तर तळमजल्यावर कोविड उपचार केंद्र सुरु आहे. त्यामुळे या विभागातून हा औषधांचा साठा कचऱ्यात टाकला गेला असावा,असा संशय नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला. या आगीमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या उपकरणाच्या केबल जळाल्याने स्थानिक टोरेंट पॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील वीजपुरवठा खंडित केल्याने सकाळच्या वेळी नागरिकांना विविध असुविधांचा सामना करावा लागला.
भिवंडीतील मीनाताई ठाकरे रंगायतनच्या आवारात आग
