मुंबई – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील हे खासदार आहेत. या खासदारकीला आव्हान देणारी याचिका काल उच्च न्यायालयाने फेटाळल्याने पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आवश्यक नियमांची पूर्तता करण्यास याचिकाकर्ते अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने नोंदवले. त्यानंतर पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारे अपक्ष उमेदवार शहाजी थोरात यांची याचिका फेटाळून लावली.
