मुंबई – शिवसेना दोन गटांत विभागल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला होत. त्यानंतर दोन्ही गटांत नेते- कार्यकर्ते यांचे इनकमिंग वाढले होते. फायरब्रँड कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश करून या गटाची बाजू भक्कमपणे मांडायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांतच सुषमा अंधारे यांचे विभक्त पती ॲड. वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, आता वाघमारे यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे पती ॲड. वैजनाथ वाघमारे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्हदेखील मिळाले. मात्र, पक्षाकडून कोणतीच महत्त्वाची जबाबदारी दिली जात नसल्याने वाघमारे यांनी शिवसेना पक्ष सोडण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झाला नसून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, वाघमारे यांनी पक्षप्रवेशावेळी अंधारे यांना थेट इशारा देत त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते. याशिवाय लवकरच अंधारे यांचा पर्दाफाश करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश चर्चेत आला होता. यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी म्हटले होते की, वैजनाथ वाघमारे यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. कोण कोणत्या गटात जातो, याने मला फरक पडत नाही. ज्याला त्याला त्निाचा र्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.
सुषमा अंधारेंचे पती ॲड. वाघमारेंची शिंदेंच्या शिवसेनाला सोडचिट्ठी
