संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 02 December 2022

Maithan Alloys Ltd: शॉर्ट टर्मसाठी फायदेशीर कंपनी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

Maithan Alloys Ltd ही भारतातील प्रमुख मॅगनीज धातूची उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे. जगभरातील मोठ्या कंपन्यांना मॅगनीज धातू पुरवण्याचं काम या कंपनीकडून केलं जातं. १९९५ सालापासून ही कंपनी कार्यरत असून NSE लिस्टेड कंपनी आहे.

२००७ ते २०१२ या काळात या कंपनीने मेघालय आणि विशाखापट्टणम येथे नवे प्लांट तयार केले. तर, याच काळात विविध देशात यांचे उत्पादन निर्यात करण्यासही सुरुवात केली. या कंपनीने नुकतेच ६ हजार टन उत्पादन कतारला पाठवले आहेत.

दरम्यान, या कंपनीची प्रगती पाहता शेअर मार्केटमध्येही ही कंपनी चांगले काम करत आहे. शॉर्ट टर्मसाठी ही कंपनी चांगली असल्याचे तज्ज्ञांचं मत आहे. या कंपनीतील प्रोमोटर्सचे शेअर्सही चांगले असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या कंपनीची चांगली भरभराट झाली आहे. या कंपनीचा रिटर्न ऑन कॅपिटल २० टक्के आहे.

या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन २५ टक्के आहे. सप्टेंबर २०२० मध्ये या कंपनीला ५५ कोटी फायदा झाला होता. तर, सप्टेंबर २०२१ मध्ये या कंपनीने १२४ कोटी रुपये मुळ नफा कमावला होता. त्यामुळे या कंपनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami