संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 07 December 2022

ग्रामीण भागात कोरोनचा फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली, आशा वर्कर्सवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली  – कोरोनाची दुसरी लाट शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त पसरली आहे. त्यातच, ग्रामीण भागात आरोग्य सुविधा नसल्याने अनेकजण शहरी भागाचा रस्ता धरत आहेत. अनेकांना प्रवासातच मृत्यू होतोय. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव रोखाण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता शहरांसोबत ग्रामीण भागात करोना फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.

नव्या नियमावलीत देखभाल, स्क्रिनिंग आणि आयसोलेशनवर भर देण्यात आला आहे. आशा कार्यकर्त्यांना यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य अधिकारी आणि एएनएमला रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात आणि उप केंद्रात हे टेस्ट किट उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

प्रत्येक गावागावात जाऊन आशा कार्यकर्त्यांना सर्दी तापाची नोंद करावी लागणार आहे. त्यांच्यासोबत सॅनेटायझेशन आणि न्यूट्रिशन कमिटीही सोबत असणार आहे. ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून येतील त्यांना आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना टेस्ट झाल्यानंतर त्यांनी आयसोलेशनमध्येे राहण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे.


जवळपास ८० ते ८५ टक्के रुग्णांना कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. त्यांना घरात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या रुग्णांना करोना नियमावलीचं पालन करावं लागणार आहे. आयसोलेशनमधील रुग्णांमध्ये गंभीर लक्षण दिसल्यास त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami