संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

मीराबाई चानुचा कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी मार्ग मोकळा; सिंगापूरमध्ये जिंकले सुवर्ण पदक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सिंगापूर – भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे ती आता कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. कॉमनवेल्थमध्ये ती ५५ किग्रॅ. वजनी गटात खेळताना दिसेल.

मीराबाई चानू पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेत ५५ किग्रॅ, वजनी गटात खेळताना दिसत आहे. तिने इथे १९१ किग्रॅ. वजन उचलले आणि सुवर्ण पदक जिंकले. त्यांना या गटात तसे फारसे मोठे आव्हान नव्हते. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची जेसिका सेवास्तेन्को हिने रौप्य तर मलेशियाच्या एली कॅसॅन्डर हिने ब्रांझ पदक पटकावले. मीराबाई आपल्या या कामगिरीवर खुश असून या स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे ती कॉमनवेल्थसाठी पात्र झाल्याने तिने समाधान व्यक्त केले. तसेच कॉमनवेल्थ स्पर्धेतही आपण चांगली कामगिरी करू असा विश्वास व्यक्त केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami