संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 02 December 2022

युद्ध कधीही होऊ शकतं, त्यासाठी तयार राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्ष वाढत आहे. कोणताही देश मागे हटण्यास तयार नसल्याने हे युद्ध आणखी काही दिवस चालेल अशी शक्यता आहे. पण या युद्धापासून अनेक देशांनी धडा घेतला आहे. या युद्धांचा परिणाम तसा अनेक देशांवर होत असतानां, रशिया-युक्रेन युद्धावर मोठे वक्तव्य लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी केले आहे. ते म्हणाले, सध्या सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धातून अनेक धडे शिकता येतील. हे संकट संपूर्ण जगासाठी हेच दर्शविते की युद्ध कधीही होऊ शकते आणि आपल्याला त्याच्यासाठी तयार राहावे लागेल.

युक्रेनवर रशियाकडून होत असलेल्या हल्ल्याने मोठी हानी होत आहे. अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यातच आता भारताच्या लष्करप्रमुखांनी या युद्धावर ही प्रतिक्रिया दिली आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, आमच्यासाठी सर्वात मोठा धडा हा आहे की भविष्यातील युद्धांमध्ये आम्हाला देशात बनवलेल्या शस्त्राचाच वापर करून लढावे लागेल. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या एलएसी तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे. भविष्यातील युद्धे आपल्याच शस्त्रांनी लढायची आहेत. या संकटाने आपल्याला दाखवून दिले आहे की युद्ध कधीही होऊ शकते आणि आपल्याला त्यांचा सामना करण्यासाठी सदैव तयार राहावे लागेल. एका कार्यक्रमात बोलताना विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले की, या युद्धाने हे दाखवून दिले आहे की पुढे आणखी युद्धे होऊ शकतात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami