संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 30 January 2023

राष्ट्रीय वाढदिवस दिन! आज का साजरे होतायत एवढे वाढदिवस?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पु.ल.नेहमी म्हणायचे, जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्येच जन्माला आला आहे आणि तो ही गुरुजींच्या पुण्याईमुळे… वाढदिवस म्हटलं की लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटणारा दिवस. जन्माला आल्यापासून आपल्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढीचे आकडेवारीत मोजमाप करणारा दिवस म्हणजेच वाढदिवस. “सोळावं वरीस धोक्याचं”, “वीस वर्षांचा घोडा झालास तरी कळत नाही का”, वयाची पन्नाशी गाठली आता रिटायर व्हा’, अशी आपल्याला मिळणारी सारी शाब्दिक आभूषणे आपल्याला वाढत्या वयाची जाणीव करून देत असतात. अर्थात प्रत्येकाचा वाढदिवस वेगवेगळ्या तारखेला साजरा होत असतो. काही वेळेला आपल्या फ्रेंड सर्कल मधल्या दोघं तिघांची, चार पाच जणांची जन्र्म तारीख एकाच असू शकते, नव्हे ती असतेच.

पण १ जून हा असा दिवस आहे की, चाळीस पन्नास वयाच्या घरात असलेल्या थोडेथोडके नाही तर किमान ५० ते १०० जणांचे वाढदिवस १ जूनलाच असतात. असं काय आहे की, १ जून हा दिवस चाळीशी पन्नाशी उलटलेल्या प्रत्येकाचाच वाढदिवस असतो. १ जूनचे वाढदिवसाचे गणित, संख्याशास्त्राला चक्रावून टाकणारे. सदर काळातील जनगणना हा तर मोठा विनोद ठरावा. एकाच दिवशी एक नव्हे तर अनेक गावांमधील अनेक बालके १ जूनला जन्माला यावी, यासारखे प्रशासकीय सत्य त्या काळातील ‘आदर्श’ प्रकरणाचं उत्तर शोधलं असता एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली….

साधारण चाळीस पन्नास किंवा त्यापूर्वी खेड्यापाड्यामध्ये सुरक्षित प्रसूतीची सोय नव्हती. सर्व काही अनुभवी सुईणीच्या हातात असायचं. शिक्षण सुद्धा कमी असल्याने जन्मलेल्या बाळाची जन्म वेळ तर सोडाच पण जन्मतारीख सुद्धा काही लोकांना माहित नसायची. मग ज्यावेळी शाळेत प्रवेश घ्यायची वेळ यायची, तेव्हा मुलाच्या पालकांना अचूक तारीख सांगता यायची नाही. त्यामुळे जन्मतारीख कोणती असा प्रश्न विचारला तर, तारखेच्या नजीकचा एखादी घटना, एखादा सण असे ठोकताळे सांगितले जायचे. पण गुरुजींना एझ्याट तारीख हवी असल्याने, पण ती काही पालकांना सांगता यायची नाही. मग काय शाळा सुरु होण्याच्या आठ – दहा दिवस आधीची तारीख गुरुजीच मुलाच्या नावापुढे लिहायचे ती शाळा प्रवेशाची तारीख म्हणजेच १ जून आणि त्यापूर्वी ५-६ वर्ष हे जन्म वर्ष म्हणून लिहिलं जाऊ लागलं आणि बऱ्याच जणांना १ जून ही जन्मतारीख चिकटली. अगदी एका घरातल्याच सर्व भावडांची जन्मतारीख ही १ जून असल्याचं दिसून येतं. अर्थात गेल्या तीस चाळीस वर्षात परिस्थतीत खूप बदल झाला आहे. जन्माच्या नोंदी सरकारी दप्तरी होऊ लागल्या आहेत. पण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी १ जून हीच सर्वांसाठी जन्मतारीख होती त्यामुळेच आज बरेच जण आपला वाढदिवस साजरा करताहेत. राष्ट्रीय वाढदिवस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

संकलन – संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami