संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

पुढील महिन्यात 8 आयपीओ येणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही अनेक कंपन्या त्यांचे आयपीओ आणणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी बंपर पैसे कमावण्याची ही चांगली संधी आहे. आठ कंपन्यांचे आयपीओ पुढील महिन्यात येत आहेत. मार्चमध्ये, LIC व्यतिरिक्त, SBI Mutual Fund, Byju’s, Ola यासह अनेक कंपन्या त्यांचे आयपीओ आणत आहेत.

LIC

भाभारतीय आयुर्विमा महामंडळाचा बहुप्रतिक्षित आयपीओ 11 मार्च रोजी येत आहे. यात सरकार आपला 5 टक्के हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. त्यातून 60,000 ते 90,000 कोटी रुपयांची उभारणी अपेक्षित आहे. या आयपीओनंतर, LIC रिलायन्स इंडस्ट्रीज आणि TCS नंतर तिसरी सर्वात मोठी कंपनी बनेल.

OYO 

OYO रूम्स आणि हॉटेल्स मार्चमध्ये त्यांचा आयपीओ लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. हॉस्पिटॅलिटी उद्योगाशी संबंधित ही कंपनी आयपीओतून 8,430 कोटी रुपये उभारण्याच्या विचारात आहे. या आयपीओमध्ये 7,000 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इश्यू आणि 1,430 कोटी रुपयांपर्यंतची ऑफर फॉर सेल करेल.

OLA

कंपनी 15,000 कोटी रुपये उभारण्यासाठी IPO आणत आहे. IPO कंपनीच्या इतर गुंतवणूकदारांना जसे की सॉफ्टबँक, टायगर ग्लोबल आणि स्टेडव्ह्यू कॅपिटल यांना त्यांचे शेअर्स विकण्यासाठी किंवा भागधारकांच्या निधीची भरपाई करण्यासाठी बाहेर पडण्यास मदत करेल.

Delhivery

ई-कॉमर्स लॉजिस्टिक फर्म Delhivery 7,460 कोटी रुपये उभारण्यासाठी आपला IPO लॉन्च करणार आहे. कंपनी 2,460 कोटींच्या ऑफर फॉर सेलसह 5,000 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्सचे फ्रेश इश्यू सादर करणार आहे. अशी अपेक्षा आहे की विद्यमान भागधारक त्यांच्या स्टेकचा काही भाग कमी करतील.

BYJU

Edtech आणि देशातील सर्वात वॅल्युएबल स्टार्टअप कंपनी Byju’s लवकरच त्यांचा IPO लॉन्च करणार आहे. ते 4 अब्ज डॉलर ते 6 अब्ज डॉलर दरम्यान निधी उभारण्यासाठी IPO आणत आहे.

NSE

भारतातील सर्वात मोठे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज 10,000 कोटी रुपये उभारण्यासाठी आयपीओ लॉन्च करण्याची योजना आखत आहे. SBI, LIC, IFCI, IDBI बँक, गोल्डमन सॅक्स, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, टायगर ग्लोबल आणि सिटीग्रुप हे कंपनीचे प्रमुख भागधारक आहेत.

PHARMEASY

फार्मास्युटिकल कंपनी PHARMEASY 6,250 कोटी रुपये उभारण्यासाठी लवकरच आपला IPO आणणार आहे. यासाठी त्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये सेबीकडे मसुदा सादर केला.

SBI Mutual Fund

SBI आपल्या म्युच्युअल फंड युनिटमधील हिस्सा विकण्यासाठी IPO आणणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेला त्यांच्या म्युच्युअल फंड युनिटमधील 6 टक्के हिस्सा विकायचा आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami