मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या नवाब मलिक यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याने त्यांना जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळीच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीने छापा मारला. त्यानंतर ईडी कार्यालयात नेऊन त्यांची तब्बल आठ तास चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना आठ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ३ मार्चपर्यंत ते कोठडीत असणार आहेत.
कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात आणण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.