संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

नवाब मलिकांचा वैद्यकीय अहवाल ईडी एम्सच्या डॉक्टरांकडून तपासणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – ईडीच्या अटकेत असलेले आणि सध्या मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार घेत असलेले नवाब मलिक यांच्या आरोग्य तपासणीचा अहवाल ईडी मुंबईतील खासगी तज्ज्ञ डॉक्टर किंवा एम्सच्या आरोग्य तज्ज्ञांकडून तपासणार आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने बुधवारी नवाब मलिकांना अटक केली. त्यांना ईडी कोठडी झाली आहे. परंतु कोठडीत ते चौकशीला सहकार्य करत नाहीत. त्यांना राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते ॲडमिट असलेल्या वॉर्ड रूमच्या बाहेर सीआरपीएफचे जवान आणि ईडीचे काही अधिकारी तैनात आहेत. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी झाली आहे. शुक्रवारी मालिकांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेले होते. तब्येत बरी नसल्याची तक्रार केल्याने व डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांना जेजेत ऍडमिट केले आहे. त्यांच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्या आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर तो एम्स किंवा खासगी डॉक्टरांकडून ईडी तपासून घेणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami