संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

“काट्यान काटो…”, सप्तसूर म्युझिकचे पहिले मालवणी गीत प्रदर्शित

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मालवणी भाषा ऐकायला अतिशय गोड वाटते.. पण मराठी चित्रपटात किंवा म्युझिक अल्बममध्ये मालवणी गाणी आतापर्यंत अगदीच मोजकी झाली आहेत. साईनाथ राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिक अँड एचडी प्रॉडक्शनतर्फे म्युझिक अल्बम क्षेत्रात वेगळा प्रयोग करत असून, “काट्यान् काटो…” या मालवणी म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली असून, अमृता देवरुखकर आणि वरद धोत्रे ही फ्रेश जोडी या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे.

सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर काट्यान काटो हा म्युझिक व्हिडिओ नुकताच लाँच करण्यात आला आहे. ज्येष्ठ संगीतकार वसंत मोरे यांच्या संगीताला हेमंत धुरी यांनी स्वरसाज दिला आहे. गीतलेखन सोनाली जेम्स साडणकर यांचं आहे, तर मुग्धा नारकर यांनी हे गीत गायलं आहे. विवेक शुक्ला यांनी सिनेमॅटोग्राफी, राधिका भट यांनी कोरिओग्राफी तर चिन्मय शिवलकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.

साईनाथ राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकनं आपल्या युट्यूब चॅनलद्वारे मराठी म्युझिक अल्बम क्षेत्रात नवा ट्रेंड निर्माण केला आहे. वेगवेगळ्या धाटणीची गाणी आतापर्यंत या चॅनलवर लाँच करण्यात आली आहेत. नव्या दमाच्या कलावंतांना या म्युझिक व्हिडिओतून संधी मिळाली आहे. त्यात आता “काट्यान काटो” या मालवणी म्युझिक व्हिडिओची भर पडणार आहे. काट्यान काटो हे अतिशय वेगळं गाणं आहे. तसंच नितांत सुंदर परिसरात चित्रीत केलेला म्युझिक व्हिडिओ प्रत्येक प्रेक्षकाला आनंददायी अनुभव देईल यात शंका नाही.

Song link

Thanks & Regards

Darshan S. Musale

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami