संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

“आमचं पिक्चर सारखं नाहीये”, शुभांगी केदारचा नवा अल्बम

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मराठी म्युझिक अल्बम विश्वात सध्या अनेक प्रयोग होताना दिसत आहेत. अनेक नव्या दमाचे कलाकार नव्या धाटणीचे शब्द, नव्या जगाचं संगीत या म्युझिक अल्बममधून सादर करत आहेत. त्यात आता शुभांगी केदार या नव्या गायिकेच्या “आमचं पिक्चर सारखं नाहीये….”या म्युझिक व्हिडिओची भर पडली आहे. शुभांगीचा हा नवा म्युझिक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

“वीकएंड कॉफी मराठी” या प्रॉडक्शन हाऊसनं “आमचं पिक्चर सारखं नाहीये” या त्यांच्या पहिल्यावहिल्या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. याआधी “वीकएंड कॉफी मराठी” प्रॉडक्शनने विविध विषयांवर शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंट्रीज केल्या आहेत. त्यामधील “वस्तीची एसटी” आणि “नदी” ह्या विशेष गाजल्या. “वीकएंड कॉफी मराठी” च्या ह्या नवीन गाण्याचं लेखन आणि संगीत प्रणीत वणवेचं आहे, तर शुभांगी केदारनं हे गाणं गायलं आहे. दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी किरण जाधव आणि नितीन पेडणेकर यांनी निभावली असून म्युझिक व्हिडिओमध्ये शुभांगी केदारसह वॉल्टर डिसुझा, पायल जाधव हे कलाकार आहेत.

“आमचं पिक्चर सारखं नाहीये” या म्युझिक व्हिडिओमध्ये एका कपलची गोष्ट दाखवण्यात आली आहे. चित्रपटासारखीच एक गोष्ट गाण्यात असल्यानं त्या कपलचा प्रवास या गाण्यातून उलगडतो. आजच्या पिढीची भाषा, शब्द, गिटार, ड्रम्स अशा वाद्यांसह मनात रेंगाळणारी चाल या गाण्याला लाभली आहे. त्यामुळे आजच्या पिढीचं लक्ष हे गाणं नक्कीच वेधून घेईल. म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेलं हे गाणं म्हणजे नक्कीच वेगळा प्रयोग ठरेल यात शंका नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami