अंदमान-निकोबार बेटाला रविवारी भूकंपाचे दोन धक्के बसले. राष्ट्रीय भूकंपमापन केंद्रानुसार, निकोबार बेटावर १० किमी खोल भूकंपाचे केंद्र होते. भूकंपमापन केंद्रावर, पहिल्या धक्क्याची तीव्रता ४.१ होती. त्यानंतर काही तासांनी ५.३ तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला.
राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राच्या (एनसीएस) माहितीनुसार याआधी अंदमान-निकोबार बेटावर ४ एप्रिल रोजी रात्री १० वाजून ४७ मिनिटांनी भूकंपचा धक्का बसला होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.६ इतकी होती. या भूकंपामुळे कोणतीही जिवीत किंवा वित्त हानी झाल्याची नोंद नाही. ‘एनसीएस’ने दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी याच परिसरात पुन्हा ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता.