अंबरनाथ
अंबरनाथ रेल्वे स्थानकात इलेक्ट्रिक रूमला आग लागल्याची घटना घडली. ही भीषण आग आज दुपारच्या सुमारास लागली. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडया तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. कर्जतकडे जाणारा रेल्वेमार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. मात्र, आग आटोक्यात आल्यानंतर येथील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.