अंबरनाथ – अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानका धावत्या रेल्वेतून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी घडली. कादरूउल्ला रफिक खान असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो चेन्नई एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली.
कादरूउल्ला रफिक खान हा आपल्या नातेवाईकांसोबत मद्रास येथून चेन्नई एक्सप्रेसने कुर्ला येथे येत होता. यावेळी चेन्नई एक्सप्रेस बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ असताना तो मेलच्या दरवाजाजवळ उभा राहिला. दरम्यान तोल जाऊन तो रेल्वेतून बाहेर पडला आणि या अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.