अंबाबाई मंदिरात नवा वाद
कॅमेरासह माध्यमांना प्रवेशबंदी

कोल्हापूर : -करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात वार्तांकनासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना कॅमेरा घेऊन प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गुरुवारी १६ मार्चला अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारावरच माध्यमांना अडवण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसा आदेश काढल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंबाबाई महालक्ष्मीच्या मूर्तीचा मुद्दा समोर आला आहे. यावरून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे. अंबाबाईच्या मूर्तीची स्थिती नाजूक असल्याचे कोल्हापूरच्या माध्यमांनी समोर आणले होते. यानंतर पहिल्यांदा राज्य पुरातत्त्व आणि नंतर केंद्रीय पुरातत्त्वकडून पाहणी करण्यात आली. मात्र, प्रसिद्धीसाठी बातम्या दाखवल्या जात असल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, केंद्रीय पुरातत्त्वकडून पाहणी करताना मूर्तीशी छेडछाड झाल्याचा आरोप श्रीपूजकांच्या वकिलांनी केला आहे.

Scroll to Top