अंबाला –
काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्रकमधून प्रवास केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राहुल गांधी दिल्लीहून शिमल्याला रवाना झाले. वाटेत अंबाला ते हा प्रवास त्यांनी ट्रकने केला. यावेळी त्यांनी वाहनचालकांच्या समस्या जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या ट्रक प्रवासाची चर्चा सध्या रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी कर्नाटकची राजधानी बंगळुरु इथील कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर यांच्याशी संवाद साधला होता. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांनी राहुल यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटले की, देशातील वेगवेगळ्या स्तरावरील लोकांच्या समस्या त्यांना समजून घ्यायच्या आहेत त्यामुळे राहुल गांधी अशा पद्धतीने प्रत्येक वर्गाच्या अडचणी समजून घेत आहेत. कोणीतरी या लोकांच्या पाठीशी उभा आहे.