अखेर फुरसुंगी,उरुळी देवाची
पुणे महापालिकेतून वगळली

पुणे – पुणे महापालिका क्षेत्रातून फुरसुंगी आणि उरळी देवाची ही दोन गावे अखेर वगळण्यात आली आहेत.यासंदर्भात राज्य सरकारने नवीन आदेश जारी केले आहेत.माजी आमदार विजय शिवतारे यांनी राज्यातील सरकार बदलल्यानंतर या दोन्ही गावांना वगळून त्यांची वेगळी नगरपरिषद करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ यांच्याकडे केली होती.अखेर ही मागणी आता पूर्ण झाली आहे.
याबाबत पुणे महापालिकेने राज्य सरकारला सविस्तर प्रस्ताव पाठवला होता. यावर विचार करून राज्य सरकारने काल नवीन आदेश काढून फुरसुंगी आणि उरळी देवाची या नवीन नगर परिषद असतील असे जाहीर केले.पुणे महापालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे. महापालिकेत समावेश केल्यानंतर या दोन्ही गावांच्या विकासाकामांना वेग आला होता. मात्र महापालिकेत समावेश करुनही पायाभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता.माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या गावासाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दोन्ही ठिकाणच्या गावकर्‍यांचीच तशी इच्छा होती.अखेर या मागणीला यश आले आहे.

आता पुणे महापालिका हद्दीतून फुरसुंगीतील स.नं. १९३,१९२पै,१९४,१९५पै (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपूर्ण महसुली गावाचे क्षेत्र आणि उरूळी देवाचीमधील-स.नं.३९,३१ व ३२ पै,(कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपूर्ण महसुली गावाचे क्षेत्र वगळण्यात आले आहे.

Scroll to Top