भुवनेश्वर
भारताच्या संरक्षण ताफ्यातील महत्त्वाचे अस्त्र असणाऱ्या अग्नी १ या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची डीआरडीओने यशस्वी चाचणी घेतली. त्यामुळे आता भारतीय लष्कराला शत्रूभागाचा अचूक वेध घेता येणार आहे.
ओदिशातील एपीजे अब्दुल कलाम तळावरून स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडद्वारे या क्षेपणास्त्राची चाचणी काल यशस्वीरीत्या पार पडली. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते भारतभूषण यांनी सांगितले की,‘अग्नी-१ क्षेपणास्त्र लक्ष्यावर अत्यंत अचूक मारा करण्यास सक्षम आहे. अग्नी-१ क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणावेळी सर्व तांत्रिक बाबींची यशस्वी चाचणी घेण्यात आली.`
अग्नी-१ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे. तब्बल १२ टन वजनाचे आणि १५ मीटर लांबीचे हे क्षेपणास्त्र एक हजार किलोपर्यंतची उपकरणे किंवा स्फोटके वाहून नेऊ शकते. ७०० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची अग्नी-१ ची क्षमता आहे.
अग्नी १ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
