मुंबई:-अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईत नवीन घर विकत घेतले आहे. या घराच्या बाहेर तिने एक पाटी लावली आहे. त्या पाटीवर तिने लिहिले की, \’कोणतेही अतिक्रमण नाही. अतिक्रमण करणाऱ्यांना गोळ्या घातल्या जातील. यातून बचावलेल्या माणसांना पुन्हा गोळ्या घातल्या जातील.\’ ही पाटी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मिडीयावर काही लोक म्हणतात की, कंगनाने मुंबई महानगरपालिकेला ही ताकीद दिली आहे. महाविकास आघाडीच्या काळात बृहन्मुंबई पालिकेच्या आदेशावरून कंगनाचे बांद्र्यातील पाली हिल येथील घर तोडण्यात आले होते. या नवीन पाटीच्या माध्यमातून तिने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत इशारा दिला आहे.