पुणे – पुण्यात महसूल विभागात अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त म्हणून पदावर असलेल्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यावर सीबीआयकडून छापा टाकण्यात आला आहे. य सीबीआयने त्यांना ८ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
अनिल रामोड यांनी एका महामार्गालगतची जमीन मोकळी करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयचे पथक पुण्यात दाखल झाले होते. दुपारी संबंधित व्यक्ती रामोड यांच्या कार्यालयात आली असताना त्यांना लाच घेताना पकडण्यात आले. सध्या अनिल रामोड याला सीबीआयच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. सीबीआयचे २० सदस्यीय पथकाने बाणेर येथील ‘ऋतुपर्णा’ सोसायटीतील अनिल रामोड यांच्या बंगल्यातही तपासणी केली. सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.