अदानीची फायनान्स कंपनी १,५०० कोटीमध्ये विक्रीला

मुंबई –

अदानी समूहाची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी ‘अदानी कॅपिटल’चा हिस्सा विकण्यात येणार आहे. हा हिस्सा विकत घेण्यासाठी ३ परदेशी कंपन्या पुढे आल्या आहेत. अदानी कॅपिटलला १,५०० कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या शर्यतीत बेन फॉर्च्युनर ही विदेशी वित्त कंपनी आघाडीवर आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्याकडे अदानी कॅपिटलचा ९० टक्के हिस्सा तर उर्वरित १० टक्के हिस्सा हा कंपनीच्या व्यवस्थापनाचा भाग असलेले गुंतवणूकदार गौरव गुप्ता यांच्याकडे आहे.

गौतम अदानी यांनी ७ वर्षांपूर्वी अदानी कॅपिटल ही कंपनी सुरू केली होती. ही कंपनी ग्राहकांना आर्थिक सुविधा पुरवते. मात्र, आता ही कंपनी विकली जाणार आहे. अदानी कॅपिटलच्या व्यवस्थापनाचा प्रमुख भाग आणि लेहमन ब्रदर्स आणि मॅक्वेरी येथील माजी गुंतवणूकदार गौरव गुप्ता या अधिग्रहणाचे नेतृत्व करत आहेत. १० जुलै रोजी याबाबतचा पहिला अहवाल देण्यात आला होता. या अहवालात बेन फॉर्च्युनर, कार्लाइल आणि सेर्बरस कॅपिटल हे तीन खाजगी समूह अदानी कॅपिटलचे अधिग्रहण करण्याच्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आहेत, असे म्हटले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top