मुंबई
अदानी समूहाच्या सर्व शेअरमध्ये पुन्हा घसरण झाली. आज अदानी समूहामध्ये ०.१० अंकांनी घसरण झाली. सर्वात जास्त शेअरची घसरण ही अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटलमध्ये झाली. शेअर बाजार उघडताच समूहाचे सगळे शेअर खाली येण्यास सुरुवात झाली तर, दुसरीकडे आज शेअर बाजाराची दमदार सुरुवात देखील झाली.
शेअर बाजारात आज सेन्सेक्स २१८.६५ अंकांनी वधारत ५९.८७३ अंकांवर सुरु झाला. तर निफ्टी १७,७०७ अंकांवर उघडला. अदानी पॉवरमध्ये बऱ्याच प्रमाणात घसरण झाली. शेअर्स १.७८ टक्क्यांनी घसरत १९५.७० अंकांवर सुरु झाले. तर, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. एनएसईमध्ये हे शेअर्स २. १४ अंकांनी घसरत ८९६.६० रुपयांवर स्थिरावले. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहासंबंधित आरोपांचा परिणाम अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर होत आहे.