अनिल जयसिंघानीचा ताबा! मध्य प्रदेश पोलिसांना देणार

मुंबई- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न करून धमकावल्याप्रकरणी अनिल जयसिंघानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मध्यप्रदेश पोलिसांनी अन्य एका प्रकरणात जयसिंघानीचा ताबा मागितला आहे. ज्याला आज मुंबई सत्र न्यायालयाने मान्यता दिली. अनिक्षाचे वडील अनिल व काका निर्मल जयसिंघानी या दोघांनीही न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. मात्र, त्यांच्याकडून आणखी माहिती मिळवायची असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यामुळे दोघांनाही न्यायालयाने कोठडी सुनावली. अमृता फडणवीस यांनी अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानिया यांच्यावर लाज देण्याचा प्रयत्न करून धमकावल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून अनिक्षा आणि अनिल यांना अटक करण्यात आली होती.

Scroll to Top