मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री अनिल परब यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात आज अनिल परब यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यामुळे अनिल परबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अनिल परब यांच्यासह सदानंद कदम, जयराम देशपांडे सहआरोपी आहेत. दरम्यान परबांना तूर्तास हायकोर्टाचा अटकेपासून दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचे प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात अनिल परब यांचे नाव पुढे आले होते. त्यानंतर सदानंद कदम, जयराम देशपांडे यांची नावेही समोर आली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर आहे.
अनिल परबांच्या अडचणी वाढल्या ईडीने केले आरोपपत्र दाखल
