अनिल परबांना कोर्टाचा दिलासा! २८ मार्चपर्यंत कारवाई नाही

मुंबई- ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांच्यावर २८ मार्चपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी सुनावणीसाठी नियमित कोर्ट आजही कामकाजासाठी उपलब्ध नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल परब यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची मुदत मुंबई उच्च न्यायालयाने २८ मार्चपर्यंत वाढवून दिली आहे. यामुळे परब यांना दिलासा मिळाला आहे. माजी राज्यमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील एका रिसॉर्टशी संबंधित ईडीचा खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे अशी विनंतीही त्यांनी केली होती. त्यानंतर कोर्टाने २३ मार्चपर्यंत त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये असे निर्देश ईडीला दिले होते. आता ही मुदत २८ तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Scroll to Top