काबूल
अफगाणिस्तानात आज सकाळी १०.१९ वाजता ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिदू फैजाबाद शहरापासून आग्नेयला ७० किमी, २२० किमी खोल होता. या भूकंपामुळे भारतातील काही भागात देखील या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, अशी माहिती माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. भारतामध्ये जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि पुंछ या भागात देखील भूकंपाचे हादरे बसले. दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.