अबू आझमींना करचोरीप्रकरणी आयकर विभागाकडून नोटीस

मुंबई :आयकर विभागाच्या वाराणसी शाखेने समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना १६० कोटी रुपयांच्या करचोरीप्रकरणी समन्स पाठवले आहे. आझमी यांनी गेल्या काही वर्षांत वाराणसीपासून मुंबईपर्यंत हवालाद्वारे ४० कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. आझमी यांना २० एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आयकर विभाग वाराणसीतील विनायक ग्रुपची चौकशी करत असताना या प्रकरणात आझमी यांचे नाव समोर आले आहे. विनायक ग्रुपने वाराणसीमध्ये अनेक इमारती, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि निवासी उंच इमारती बांधल्या आहेत. कागदावर विनायक ग्रुपचे तीन भागीदार सर्वेश अग्रवाल, समीर दोशी आणि आभा गुप्ता असल्याचे आयटी तपासात आढळून आले.आभा गुप्ता गणेश गुप्ताची पत्नी असून अबू असीम आझमीसह ते निकटवर्तीय आणि सहकारी असल्याचे समजते. गणेश गुप्ता मृत्यूपूर्वी महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे सरचिटणीस होते आणि कुलाब्यातील आझमी यांच्या इमारतीत त्यांचे कार्यालय चालवत असत.
तपासादरम्यान, तिन्ही मालकांच्या ईमेल आणि स्टेटमेंट्सवरून उघड झाले की विनायक ग्रुपचे उत्पन्न चार भागांमध्ये विभागले गेले आणि चौथा भाग अबू असीम आझमीकडे जायचा. २०१८ ते २०२२ पर्यंत २०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १६० कोटीचा खुलासा उघड झाला. हवाला माध्यमातून आझमी यांना ४० कोटी रुपये पाठवण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. विशेष म्हणजे इनकम टॅक्सने गेल्यावर्षी अबू आझमी यांच्याशी संबंधित कुलाबा या ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर आता अबू आझमी यांना चौकशीचे समन्स पाठवण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top