अभिनेता केके यांच्या गाडीनेघेतला पेट! मुलगा बचावला

मुंबई – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता केके गोस्वामीच्या कारला आग लागल्याची घडताना घडली. या अपघातातून त्यांचा २१ वर्षांचा मुलगा नवदीप थोडक्यात बचावला. ही घटना शनिवारी रात्री बांद्रातील एसव्ही रोडवर घडली आहे.

केके गोस्वामी यांचा मुलगा फिल्मिस्तान स्टुडिओजवळील त्याच्या घरातून त्याच्या वडिलांच्या कारने कॉलेजला जात होता. त्यावेळी या गाडीने अचानक पेट घेतला. या घटनेननंतर अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे केके गोस्वामचा मुलगा मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला. त्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नसून तो सुखरूप आहे. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या कारला नेमकी आग कशी लागली याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top